स्वित्झर्लंडमधल्या Zurich मध्ये जगामधल्या गडकिल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होत. जगातले उत्तोमोत्तम किल्ले तिथे मांडण्यात आले होते, इजिप्तचे, ग्रीसचे, रोमचे, रशियाचे, चीनचे, जपानचे आणि जगभरातल्या गडकोटांमध्ये सर्व जगात सर्वोत्तम ठरला तो माझ्या महाराजांचा राजगड. शिवाजी महाराज सोळा वर्षाचे होते तेव्हा राजगड बांधायला सुरवात केली आणि शिवराय २६ वर्षाचे झाले तेव्हा राजगड बांधून पुरा झाला. जगभरातल्या अभियंत्यांनी शिवाजी महाराज या अभियंत्याला मुजरा केला. रायगडावर नगारखानाच्या खाली कितीही हळू आवाजात बोललो तरी सिंहासनाजवळ आजही स्पष्ट ऐकू येत. ध्वनी क्षेपकाचा शोध लागण्यापूर्वी ध्वनी क्षेपकाशिवाय ऐकू येण्याची ही तंत्रप्रणाली शिवाजी महाराजांनी रायगडावर निर्माण केली. आता..आज.. आमच्याकडे ग्राम स्वछता अभियाने आली रायगडावर आणि कुठल्याही किल्ल्यावर साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी बांधलेली शौचालयं, बंधिस्त गटार योजना आजही आम्हाला विस्मय चकित करते. झाडं लावा झाडं जगवा आज आम्ही सांगतो. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराज ज्या गडावर गेले त्या गडावर आंब...