Skip to main content

म्हणून मी नेहमी आनंदी असतो

*म्हणून मी नेहमी आनंदी असतो 😊*

मी भुतकाळ चघळत नाही
मी भविष्याची चिंता करत नाही नियोजन करतो
मी वर्तमानात जगतो
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो😊*

मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही,
मी कुणाबद्दल राग मनात 
धरत नाही,
मी लगेच सगळ्यांना माफ करतो,
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो.😊*

मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही,
आपुलकीची आणि मैत्रीची किंम्मत नसणाऱ्यासाठी कधीच दुःखाने तडफडत नाही,
साधं राहुन आपल्या माणसांत सुखानं रमतो,
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊*

कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही,
कोणी काहीही बोललं तरी 
पुन्हा मी ते स्मरत नाही,
माझे जीवन स्वछंदी आहे, 
ते मी मजेत जगतो,
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊*

मला ना पदाचा ना ज्ञानाचा
अहंकार,  कधी मला
तुच्छतेचा विचार,  कधी
मनाला  नाही भावला,
पाय जमिनीवर ठेऊन प्रसंगी 
अनवाणी चालतो, 
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊*

जगायला काहीच भौतिक
सुख लागत नाही,
म्हणून मी गर्वाने कधीच
वागत नाही,
सगळ्यांशी प्रेमाने आदराने 
आपुलकीने वागतो,
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊*

जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे, याची मला जाणीव आहे, 
माझ्यातही दोष आहेत आणि 
काहीतरी नक्कीच उणीव 
आहे,
माझे दोष मी रोजच पाहुन
सुधारण्याचा प्रयत्न करतो,
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो.*                           
                                                              *"आपले आनंदी रहाणे हेच आपल्या निरोगी जीवनाचे मूलमंत्र आहे"*                  🙏🏻🌸🌸🌸🌸🌸🙏🏻

Comments

Popular posts from this blog

अक्षय तृतीय च्या सर्वाना शुभेच्छा

अक्षय तृतीय च्या सर्वाना शुभेच्छा 

नवीन आवृत्ती English - मराठी पुस्तकाचे प्रकाशन झाले

माननीय सहसंचालक श्री चंद्रकांत निनाळे साहेब व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या हस्ते श्री मनोज डोळे कोल्हापूर यांचे टर्नर ट्रेड चे QR कोड वर आधारित नवीन आवृत्ती English - मराठी पुस्तकाचे प्रकाशन झाले या वेळी श्री मुंडासे साहेब प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व श्री नार्वेकर साहेब उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व इतर मान्यवर उपस्थित होते. 

Infinity